शीतल टाईम्स //- बेलापूर बाजारतळात स्ट्रीट लाईट बसवून व्यापाऱ्यांना दिलासा गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या मागणीला ग्रामपंचायतीचा प्रतिसाद

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी


बेलापूर बाजारतळात स्ट्रीट लाईट बसवून व्यापाऱ्यांना दिलासा

गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या मागणीला ग्रामपंचायतीचा प्रतिसाद ; पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार 

बेलापूर (प्रतिनिधी)

 बेलापूर बाजारतळ परिसरात व्यापारी व ग्राहकांच्या सोयीसाठी स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. प्रवरा नदीच्या काठावर भरविण्यात येणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेते आणि ग्राहक मोठ्या संख्येने येतात. हा बाजार उशिरापर्यंत सुरू राहतो, परंतु स्ट्रीट लाईट नसल्याने व्यापारी व नागरिकांना अंधारात देवाणघेवाण करावी लागत होती.

अंधाराचा फायदा घेत चोरी, देवाण घेवाणीत  हुका-चूक  व मोबाईल चोरीच्या घटनाही वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गौसे आजम सेवाभावी संस्थेने ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि उपसरपंच यांना निवेदन देऊन बाजारतळात तातडीने स्ट्रीट लाईट बसवाव्यात, अशी मागणी केली होती.

संस्थेच्या या मागणीची दखल घेत बेलापूर ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई करून बाजारतळात स्ट्रीट लाईट बसविल्या. या कामगिरीबद्दल संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीनाताई साळवे, उपसरपंच चंद्रकांत नवळे पाटील, ग्रामपंचायत सदस्य शफीक बागवान, मुस्ताक शेख, बाबूराव पवार, अजीज शेख, मोहसिन सय्यद, तवस्सर बागवान, सरफराज सय्यद, रफीक शाह, सागर खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

गौसे आजम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अली सय्यद, अध्यक्ष सुलतान शेख, उपाध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सोनू शेख, बेलापूर अध्यक्ष अल्कमा शाह, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, कार्याध्यक्ष नासीर शेख, तसेच सदस्य रेहान शेख, अजीम शेख, आयाज सय्यद, अतिक शेख, फरान इनामदार, हरून अत्तार, अंसार अत्तार, आरामन काझी आदींनी उपस्थित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.



********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव