शीतल टाईम्स //- विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या जीवनात सतत बाळगावा.. मिलींदकुमार वाघ तहसीलदार श्रीरामपूर
शीतल टाइम्स प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या जीवनात सतत बाळगावा..
मिलींदकुमार वाघ तहसीलदार श्रीरामपूर
संत तेरेजा शैक्षणिक संकुलात 53 वे गणित विज्ञान प्रदर्शन उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न....
श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा शैक्षणिक संकुल हरेगाव येथे 53 वे तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शन उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी 61 माध्यमिक शाळा, 20 प्राथमिक शाळेसह एकुण उपकरणे 254 नोंद झाली आहे.
. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रजा जागृती शिक्षण संस्थेचे सचिव रे.फा.डाॅमानिक रोझारिओ, श्रीरामपूर येथील तहसिलदार श्री.मिलींदकुमार वाघ साहेब यांच्या शुभहस्ते व गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर येथील मा.श्री.सुभाष म्हस्के व गटशिक्षणाधिकारी श्री.संजीवन दिवे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
तसेच सर्व पाहूण्याचे औक्षण इयत्ता 12 वी कला शाखेच्या मुलींनी केले व लेझिम पथकांच्या पथकाने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व इशस्तवन गित होवून संत तेरेजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी सर्वांचे शाॅल व बुके देवून सर्वांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्रीरामपूरचे तहसिलदार मा.श्री.मिलींदकुमार वाघ साहेब यांनी अंधश्रद्धा व विज्ञान यांचा संबंध लावून विद्यार्थीना भविष्याची जाणिव करून दिली. संजीवन दिवे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना मुलांना विज्ञानाविषयी माहिती दिली तर अध्यक्षस्थानी रे.फा.डाॅमानिक रोझारिओ यांना आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, विज्ञान हि विकासाची आणि आपल्या सर्वांच्या विकासाची जननी आहे.
यावेळी 53 व्या तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शन सोहळा साजरा करताना तहसिलदार मा.श्री.मिलींदकुमार वाघ, गटविकास अधिकारी मा.श्री.सुभाष म्हस्के साहेब, सचिव रे.फा.डाॅमानिक रोझारिओ, गटशिक्षणाधिकारी मा.श्री.संजीवन दिवे साहेब, रे.फा. फ्रान्सिस ओहोळ,संत तेरेजाचे प्राचार्य श्री.बलमेसर, मुख्याध्यापक सचिन शिंगाडे सर,सुर्यकांत डावखर सर, इरफान पठाण सर,लेविन भोसले सर, कर्पे मॅडम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी शशिकांत थोरात सर, विजय नान्नर सर सुर्यकांत सराटे सर, रूपाली पवार मॅडम, नवनाथ साळवे सर, साहेबराव रक्टे सर ,संत तेरेजा शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच तालुक्यातील सर्व शाळेचे गणित विज्ञान शिक्षक व माॅडेल तयार करणारे विद्यार्थी व पालक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालन प्रा.श्रीमती स्वाती पारखे यांनी केले,तर आभार संत तेरेजा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन शिंगाडे यांनी मांडले.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा