पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शीतल टाईम्स//करजगावच्या सरपंचपदी रतनबाई आरंगळे बिनविरोध शीतल टाईम्स आंबी प्रतिनीधी

इमेज
करजगावच्या सरपंचपदी रतनबाई आरंगळे बिनविरोध शीतल टाईम्स आंबी प्रतिनीधी शीतल टाइम्स प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या करजगावच्या सरपंचपदी राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती वेनुनाथ कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली रतनबाई बाळासाहेब आरंगळे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या सभागृहात तहसीलदार राहुरी यांनी प्राधिकृत केलेले निवडणूक अध्यासी अधिकारी व देवळाली प्रवराचे मंडलाधिकारी बाळकृष्ण जाधव यांनी काम पहिले. त्यांना तलाठी प्राजक्ता रामफळे, ग्रामसेवक भारत पटारे, कोतवाल राजेंद्र चक्रनारायण यांनी सहकार्य केले. सरपंच पदाची सूचना ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कोतकर यांनी मांडली तर त्यास अनुमोदन उपसरपंच आण्णासाहेब देठे यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयश्री नवनाथ कोतकर, माजी सरपंच गणेश दिगंबर कोतकर, उपसरपंच आण्णासाहेब काशिनाथ देठे, सुजाता सचिन लोंढे, भारती राधाकिसन कोतकर हे उपस्थित होते. यानंतर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात नवनियुक्त सरपंच रतनबाई आरंगळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी करजगाव सोसायटीचे माजी चेअरमन चांगदेव कोतकर, इस्माईल पठाण, पंढ...

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

इमेज
बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाइम्स प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक हि विखे-मुरकुटे-ससाणे अशा युतीने लढविली. माञ सत्ता मिळताच सभापती सुधीर नवले यांना संस्थेच्या वाटचालीस मोलाचे योगदान असणाऱ्या  महसूल मंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा विसर पडला आहे. सभापती हे प्रभारी सचिवांना हाताशी धरुन बहुमतच्या जोरावर मनमानी कारभार करीत आहेत. याच्या निषेधार्थ विखे गटाच्या सदस्यांनी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नाम.विखे गटाचे उपसभापती अभिषेक खंडागळे,माजी सभापती नानासाहेब पवार,गिरीधर आसने,नानासाहेब शिंदे,सौ. सरला बडाख आदिंनी बाजार समितीच्या सर्वसाधारण बैठकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहिर केले आहै.याबाबत प्रसिध्दीसाठी दिलेल्या पञकात म्हटले आहे की ,बाजार समितीची निवडणुक नाम.राधाकृष्ण विखे,माजी आ.भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली लढविली गेली.सुधीर नवले हे सभापती तर अभिषेक खंडागळे उपसभापती झाले....

शीतल टाईम्स//बेलापूर बुll ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदाच 'महिला राज' सरपंच स्वाती अमोलिक यांच्या अध्यक्षतेखाली तबसुम बागवान यांची बिनविरोध निवड शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

इमेज
बेलापूर बुll ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदाच 'महिला राज' सरपंच स्वाती अमोलिक यांच्या अध्यक्षतेखाली तबसुम बागवान यांची बिनविरोध निवड शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत महसूलमंत्री नाम. राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखालील तसेच शरद नवले व अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखालिल गावकरी मंडळाच्या सौ.तबसुम शफिक बागवान यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच पदावर स्वाती अमोलिक ह्या असल्याने बेलापूर ग्रामपंचायतीत 'महिला राज' दिसणार आहे. बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी शुक्रवार (ता.२९)रोजी निवडणुक झाली. या निवडणुकीसाठी सरपंच स्वाती अमोलिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सदर बैठकीस अभिषेक खंडागळे, मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले, प्रियंका कुऱ्हे, उज्वला कुताळ, सुशिलाबाई पवार, मीना साळवी, वैभव कुऱ्हे, रविंद्र खटोड, भरत साळुंके, रमेश अमोलिक हे सदस्य, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे उपस्थित होते. निवडणुकीसाठी जि.प.सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे नेतृत्वाखालील गावकरी मंडळाच्या...

शीतल टाईम्स //बदलापुरातील अत्याचाराचा बेलापुरात निषेध शीतल टाईम्स बेलापुर (प्रतिनिधी)

इमेज
बदलापुरातील अत्याचाराचा बेलापुरात निषेध शीतल टाईम्स बेलापुर (प्रतिनिधी) बदलापुर येथील घटनेचा बेलापुरातील विविध संघटना तसेच गावातील युवकांनी काळ्या फिती लावुन जाहीर निषेध केला, तसेच आरोपीवर दाखल केलेला खटला जलदगती न्यायालयात चालवावा व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. आपल्या परिसरात अशा घटना घडू नये या करीता पोलीस प्रशासनाने शाळा काॅलेज मधुन गस्त वाढवावी तसेच शाळा काॅलेज मध्ये तक्रारपेटी बसविण्यात यावी जेणे करुन अशा घटनाना आळा बसेल अशीही मागणी करण्यात आली.   या वेळी बेलापुर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक विक्रम नाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, रफीक शेख, पत्रकार देविदास देसाई, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा, विशाल मेहेत्रे, मयुर खरात, अक्षय नाईक, कैलास औटी, राफीक शहा, नितीन अमोलीक, गौरव वाकडे, रोहन शेलार, शहानवाज सय्यद, दिपक पुंड, अजय वायदंडे, तौफीक शेख, आमोल जाधव, योगेश काळे, किरण अमोलिक, सोनु शेलार, कुमार फुलमाळी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. शीतल टाइम्स प्रतिनिधी *************************************************** ****************...

शीतल टाईम्स //संशयास्पद तांब्याच्या तारा तडजोड प्रकरणी एपीआय आव्हाड यांची चौकशी सुरू शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी

इमेज
संशयास्पद तांब्याच्या तारा तडजोड प्रकरणी एपीआय आव्हाड यांची चौकशी सुरू शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी   शीतल टाइम्स प्रतिनिधी महिन्यापूर्वी श्रीरामपूर येथून संशयास्पद तांब्याच्या तारा घेवून जाणारा ट्रक व टेम्पो मोठी आर्थिक तडजोड करुन सोडून दिल्या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड व त्यांचे रायटर ज्ञानेश्वर वाघमोडे यांचेविरुध्द पोलीस महासंचालकांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने पोलिस उपाधिक्षक बसवराज शिवपुजे यांनी चौकशी सुरु केल्याची माहिती तक्रारदार भा.ज.प.चे नेते सुनिल मुथा यांनी दिली.                                            याबाबतचा सविस्तर तपशील असा की, शनिवार ता.१३ जुलै रोजी राञी संशयास्पद तांब्याच्या तारा घेवून जाणारा ट्रक  व टेम्पोबाबतची खबर ए.पी.आय.सुरेश आव्हाड यांना मिळाली.सदरची खबर मिळताच श्री.आव्हाड व त्यांचे रायटर श्री.वाघमोडे यांनी बेलापूर येथिल नगर बायपासला राञी सदरची वाहने पकडून बेलापूर पोलिस चौकीत आणली. यानंतर श्रीरामपूर येथील वार्ड नं.२ ...