पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शीतल टाईम्स//- घरातील वस्तू घेताहेत आपोआप पेट ; गावकरी अचंबित! पोलीसांसह अनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतली घटनास्थळाची भेट शीतल टाईम्स प्रतिनिधी

इमेज
घरातील वस्तू घेताहेत आपोआप पेट ; गावकरी अचंबित!  पोलीसांसह अनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतली घटनास्थळाची भेट  शीतल टाईम्स प्रतिनिधी  शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर( प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील पुजारी कुटुंबीयांच्या घरातील वस्तू आपोआप पेट असून या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्ण दहशतीखाली आहे. या घटनेचा तातडीने तपास लावून पुजारी कुटुंबीयांची भीती घालवावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर आठ दिवसापूर्वी दगडे येत होती त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला त्यानंतर दगडे येणे बंद झाली. काल अचानक त्यांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेऊ लागल्या, घरातील गादी, उषी, प्लास्टिकच्या वस्तू या आपोआप पेटू लागल्या. काल सायंकाळी साडेचार वाजता पुजारी कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या घरातील गादीने आपोआप पेट घेतला. थोड्या वेळात किचन रूम मधील वस्तू जळाल्या या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्णतः घाबरून गेले. त्यांनी तातडीने आपल्या वस्तू शेजारच्या घरात नेऊन ठेवल्या. आज सकाळी (शुक्रवार) त्यांनी घरातील पूर्ण सामान बाहेर आणून ठ...

शीतल टाईम्स //सामाजिक कार्यकर्ते डावरे यांच्याकडून बाक भेट शीतल टाईम्स प्रतिनिधी

इमेज
सामाजिक कार्यकर्ते डावरे यांच्याकडून बाक भेट शीतल टाईम्स प्रतिनिधी शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर (प्रतिनिधी )-सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने विष्णुपंत डावरे यांच्या सौजन्याने हनुमान मंदिर बेलापूर त्याचबरोबर श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर व तलाठी कार्यालय बेलापूर खुर्द या ठिकाणी तीन बाक भेट देण्यात आले.  बेलापूर खुर्द येथील कामगार तलाठी श्रीमती कातोरे मॅडम यांनी सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे यांच्याकडे खंत व्यक्त केली होती की तलाठी कार्यालयात आपल्या कामाकरिता शेतकरी येतात परंतु येथे बसण्याची गैरसोय होत आहे. त्यांनी व्यक्त केलेली खंत लक्षात घेता विष्णुपंत डावरे यांनी तात्काळ त्या ठिकाणी बाकडे देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांनी बेलापूर खुर्द तलाठी कार्यालयात एक, श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर येथे एक व रामगड येथील हनुमान मंदिर या ठिकाणी एक असे तीन बाकडे भेट दिले. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या समवेत करण्यात आला. यावेळी विष्णुपंत डावरे यांनी मनोगत  व्यक्त करताना सांगितले की आपल्याजवळ जे आहे त्याच्यातील थोडाफार जरी वाटा आपण समाज...

शीतल टाइम्स प्रतिनिधी सेंट लुक्स कॉलेज ऑफ नर्सिंग, श्रीरामपूर मध्ये महिला मेळावा उत्साहात साजरा

इमेज
शीतल टाइम्स प्रतिनिधी  सेंट लुक्स कॉलेज ऑफ नर्सिंग, श्रीरामपूर मध्ये महिला मेळावा उत्साहात साजरा श्रीरामपूर येथील सेंट लुक्स हॉस्पिटल मधील कॉलेज ऑफ नर्सिंग आणि समाजसेवा विभागातर्फे दिनांक १५ मार्चला महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून राजश्रीताई ससाणे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मदर तेरेसा या ममता प्रेम, त्याग आणि सेवा यांचा अनोखा संगम आहे. त्यांनी दीन दुबळ्या, गोरगरीब, दिव्यांग आणि अनाथांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून दिले. त्यांच्या कार्याचा वारसा सेंट लुक्स हॉस्पिटल च्या नन्स,सिस्टर्स, कर्मचारी समाजसेवक आणि विद्यार्थी यशस्वीरीत्या पुढे चालवत आहेत. महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार, बचत गट, सांस्कृतिक आणि सामाजिक विविध उपक्रम राबविले जात आहेत. यावेळी राजश्रीताई ससाणे यांनी कविता सादर केली, त्यास महिलांनीही उस्फुर्त प्रतिसाद दिला. महिला मेळाव्यात प्रथमतः दिपप्रज्वलन, महापुरुष आणि महिलांसाठी कार्य केलेल्या थोर महिलांना अभिवादन करण्यात आले. उपस्थित प्रमुख आणि पदाधिकारी महिलांचा सत्कार करण्यात आला. तदनंतर विविध बचत गट आणि मंडळाच्या महिलांनी...

शीतल टाईम्स //पत्रकार पठाण यांना झालेल्या मारहाणीचा बेलापुरात निषेध शीतल टाईम्स प्रतिनिधी

इमेज
पत्रकार पठाण यांना झालेल्या मारहाणीचा बेलापुरात निषेध शीतल टाईम्स प्रतिनिधी  शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर (प्रतिनिधी )- श्रीरामपूर येथील पत्रकार सलीम पठाण यांना झालेल्या मारहाणीचा बेलापूर व परिसरातील पत्रकारांनी तिव्र शब्दात निषेध करून मारहाण करणाऱ्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे.                   श्रीरामपूर शहरातील पत्रकार सलीम पठाण यांना काही व्यक्तींनी जबर मारहाण केली या घटनेचा बेलापूर व  परिसरातील पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध केला असून आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन व्हावे अशी मागणी पत्रकारांनी केली आहे याबाबतचे निवेदन बेलापूर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले बेलापूर पोलीस स्टेशनचे हवलदार बाळासाहेब कोळपे यांनी  निवेदन स्वीकारले यावेळी पत्रकार देविदास देसाई, मारोतराव राशिनकर, प्राध्यापक ज्ञानेश गवले, महेश मोहोळ, दिलीप दायमा, सुहास शेलार, शरद थोरात, भरत थोरात आदी पत्रकार उपस्थित होते. ******************************** ********************************    -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्ना...

शीतल टाईम्स //- बेलापुरात मराठी शाळेसमोरील जुगार अड्ड्यावर छापा ; ९ जुगारी पकडले शीतल टाईम्स प्रतिनिधी

इमेज
बेलापुरात मराठी शाळेसमोरील जुगार अड्ड्यावर छापा ; ९ जुगारी पकडले शीतल टाईम्स प्रतिनिधी बेलापूर (प्रतिनिधी)-बेलापूर बुद्रुक येथील वडारवाडा परिसरात पोलिसांनी छापा टाकत ९ जुगाऱ्यांना पकडले आहे. बेलापूर बद्रुक येथील मराठी शाळेसमोर असलेल्या बडारवाडा येथील दादा भाई बागवान यांच्या घराच्या भिंतीच्या पाठीमागे अडोशाला तिरट नावाचा जुगार खेळताना किरण अनिल गायकवाड, किरण नारायण मुंडलिक, जगन्नाथ पुंजाहरी गाढे, कचरू मारूती मांजरे, सुभाष विठ्ठल गायकवाड, शरद अशोक गायकवाड, राजू मारूती गायकवाड, विलास मोहन बोरूडे, सर्व रा. बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर, तसेच अफसर कादर अब्दूल खान, रा. रामगड, बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर यांना पोलिसांनी छापा टाकून दुपारी २.४५ च्या दरम्यान रंगेहाथ पकडले. या छाप्यात पोलिसांनी ४ हजार रूपयांची रोकड व पत्ते जप्त केले असून याप्रकरणी पोकॉ. पंकज सानप यांनी फिर्याद दिल्यावरून श्रीरामपूर शहर पोलिसात वरील ९ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. हापसे हे करीत आहेत. ******************************** **************************...

शीतल टाईम्स //- माळवाडगाव येथे शिवजयंती निमित्त महाआरती संपन्न शीतल टाईम्स प्रतिनिधी

इमेज
माळवाडगाव येथे शिवजयंती निमित्त महाआरती संपन्न शीतल टाईम्स प्रतिनिधी  शीतल टाइम्स प्रतिनिधी मावळगाव येथे आज शिवजयंती निमित्त महाआरतीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माजी सरपंच डॉक्टर नितीन दादा असणे व भजपा प्रदेश उप अध्यक्ष सुरेश आसने व भाजपा नेते नितीन भाऊसाहेब असणे व छत्रपती कृषी सेवा केंद्राचे मालक बाळासाहेब हुरुळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.  सोमनाथ आसने व प्रवीण साळवे  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महाआरतीची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी सरपंच डॉक्टर नितीन दादा आसने, भाजपा प्रदेश  अध्यक्ष सुरेश आसणे, भाजपा नेते नितीन भाऊसाहेब असणे, बाळासाहेब हुरुळे, पत्रकार इम्रान शेख, पत्रकार प्रवीण साळवे, विलास आसने, बाळासाहेब गुडेकर, ग्रामपंचात सदस्य संजय खताळ, विठ्ठल कावरे, संजय बाबर,भाजपा चे सुनील अनुसे प्रशांत दांगट, संभाजी लटमाळे राजेंद्र असणे, नितीन खाजेकर या प्रमाणे अनेक भाजपा चे कार्यकर्ते व तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते        त्याचप्रमाणे शालेय मुलींच्या हस्ते आरती करण्या...

शीतल टाईम्स // बेलापूरगावची कायदा व सुव्यवस्था काटेकोर करणार - पो.कॉ.संपत बडे शीतल टाईम्स प्रतिनिधी

इमेज
बेलापूरगावची कायदा व सुव्यवस्था काटेकोर करणार - पो.कॉ.संपत बडे शीतल टाईम्स प्रतिनिधी  शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूरः- बेलापूर पौलिस औट पोस्टच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली  कठोर पावले उचलली जातील. अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकांबाबत सरकारच्या निर्देशाचे काटेकोर पालन करण्यात येवून याबाबत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे प्रतीपादन काँन्स्टेबल संपत बडे यांनी केले. श्री.बडे यांना नुकताच उत्तर महाराष्ट्रातील "बेस्ट कॉप ऑफ द मंथ" अर्थात 'महिन्यातील सर्वोत्तम पोलीस अधिकारी' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बेलापूर पत्रकार संघाच्यावतीने संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे व सचीव रणजीत श्रीगोड यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारास उत्तर देताना श्री.बडे बोलत होते. याप्रसंगी काँस्टेबल भारत तमनर समवेत संघाचे खजीनदार सुनिल मुथा, सहसचिव विष्णुपंत डावरे, सुनिल नवले, सुहास शेलार, दिपक क्षत्रिय, दिलिप दायमा, आतिष देसर्डा, ऑडीटर संजय गोरे आदि उपस्थित होत. प्रास्ताविक करता...