पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शीतल टाईम्स । प्रतिनिधी दिवंगत कवियत्री संजीवनी खोजे यांचे नगर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठे योगदान - जयंत येलूलकर

इमेज
        संजीवनी खोजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करतांना प्रा.  मेधाताई काळे, कवी चंद्रकांत पालवे, प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये, सुरेश चव्हाण व दिलीप खोजे शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, जयंत येलूलकर, मार्गदर्शक ज्ञानदेव पांडुळे व इतर (छाया -: संजय दळवी.) शीतल टाईम्स । प्रतिनिधी दिवंगत कवियत्री संजीवनी खोजे यांचे नगर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठे योगदान - जयंत येलूलकर शीतल टाईम्स । प्रतिनिधी दिवंगत कवियत्री संजीवनी खोजे यांचे नगर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठे योगदान - जयंत येलूलकर अहमदनगर (प्रतिनिधी) :-  दिवंगत कवियत्री संजीवनी खोजे यांचे नगर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या स्मृतींचा जागर करण्यासाठी कवयित्री संजीवनी खोजे स्मृति कार्यक्रमाचे आयोजन केले असून यापुढे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी केले. *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- शनिवार ची रम्य सायंकाळ, कवयित्री ...

शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी पोलीस असल्याचे भासवून झडती घेण्याच्या बहाण्याने एक तोळ्याची अंगठी केली लंपास

इमेज
       शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी पोलीस असल्याचे भासवून झडती घेण्याच्या बहाण्याने एक तोळ्याची अंगठी केली लंपास बेलापुर  (प्रतिनिधी  )-पोलीस असल्याचे भासवून बेलापूर बायपास जवळ  एक तोळ्याची अंगठी घेवुन चोरटे पसार झाले असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या बाबत समजलेली माहीती अशी की गोरक्षनाथ कुऱ्हे हे आपल्या घरी चालले असताना बेलापुर बायपासला एका लाल टी शर्ट घातलेल्या व्यक्तीने त्यांना अडविले आम्ही पोलीस आहोत. तुमची झडती घ्यावयाची आहे. असे सांगुन बोटातील एक तोळ्याची अंगठी काढुन धूम ठोकली त्या वेळी जवळच काही नागरीक उभे होते त्यांच्या ही बाब लक्षात आली तो पर्यत  चोरटे पसार झाले होते. बेलापुर चौकात आता सी सी टी व्ही कॕमेरे  लावलेले असतानाही कॕमेऱ्याची नजर चुकवुन चोरटे दिवसा नागरीकांना लुटत आहे. घटनेची माहीती मिळताच पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे व हरिष पानसंबळ यांनी परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. परंतु ठोस असे काहीही हाती आले नाही. ****************************************************** *****************************...

शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापुरात आ.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान

इमेज
शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापुरात आ.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान बेलापूर:-(प्रतिनिधी) येथे माजी मंत्री आ.राधाकृष्ण  विखे पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी, कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता समाजाची सेवा करणारे कोरोना योद्ये हेच खरे देवदूत आहेत, असे गौरोद्गार आ.विखे पाटील यांनी काढले.   बेलापूर खुर्द येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील मित्र मंडळाच्यावतीने कोराना काळात जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा आ.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बेलापूर खुर्द चे ग्राम विकास अधिकारी सी डी तुंबारे, माजी सरपंच अनुराधा गाडे, कामगार तलाठी, विकास शिंदे, पोलीस पाटील युवराज जोशी, उमेश बारहाते, बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवीदास चोखर, डॉक्टर सी पी गडाख, श्रीमती के एल बाचकर, धिवर मॅडम, आशा सेविका विमल माने, संगीता पुजारी, उषा गुलदगड, अविष्का भालेराव, मनीषा थोरात, इंदुबाई पुजारी, मंगल विधाने, जयश्री पुजारी, उज्वला पुजारी, यमुना पुजारी, कुसुम ...

शीतल टाईम्स । प्रतिनिधी राणेंच्या वक्तव्यासंदर्भात सरकारचे सुडाचे राजकारण ; माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

इमेज
       शीतल टाईम्स । प्रतिनिधी राणेंच्या वक्तव्यासंदर्भात सरकारचे सुडाचे राजकारण ; माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शीतल टाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)   नारायण राणे हे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ते भूमिका स्पष्ट करतीलच प्रदेशाध्यक्षांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु त्यावरुन जे सूडाचे राजकारण चालू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे. असे मत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.  जि प सदस्य शरद नवले यांच्या वस्तीवर स्नेह मेळावा व कार्यकर्त्यांशी हितगुज कार्यक्रमासाठी ते आले असता पत्रकारांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया घेतली असता माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा म्हणाले की राज्यातील शासन सूडाचे राजकारण करत आहे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमताच नाही आॕन लाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिक्षण मंत्री महोदयांना राज्यातील सर्व मुलांना मोफत टॕब देण्याची सूचना केली होती अनेक मुलाकंडे छोटे छोटे मोबाईल असल्यामुळे त्यांना निट समजत नाही मोबाईलला रेंजच नसते शाळा केव्हा सुरु होईल याचाही स...

शीतल टाईम्स - बेलापुरात पोलीस बांधवांसह पत्रकार व गावकरत्यांना राखी बांधून रक्षा उत्सव साजरा शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी

इमेज
       शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापुरात पोलीस बांधवांसह पत्रकार व गावकरत्यांना राखी बांधून रक्षा उत्सव साजरा शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी      बेलापुर ग्रामस्थ व पत्रकारांनी बेलापुर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन सण साजरा करुन चांगली परंपरा जपली आहे. रक्षाबंधन सण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे मायेचे प्रतिक भाऊ आपल्या बहीणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. त्याप्रमाणे आपण घरात निवांत झोपतो त्यावेळी, पोलीसदादा रात्रभर गस्त घालत असतात. आपल्या आया बहीणींची रक्षा करत असतात. याची जाण ठेऊन गेल्या काही वर्षापासून पत्रकार व बेलापुर ग्रामस्थ यांनी पोलीसा समवेत रक्षाबंधन सण साजरा करण्याची परंपरा सुरु केली.  या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की सिमेवर कर्तव्य बजावणारा जवान व गावात नागरीकांचे संरक्षण करणारा पोलीस यांचे कार्य समान आहे. पोलीसांना आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे कोणताही सण उत्सव आपल्या कुटुंबासमवेत साजरा करता येत नाही. त्यामुळे पोलीसा समवेत सण साजरे करण्याची चांगली प्रथा पत्रकार देविदास देस...

शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्थेला 92 लाखांचा निव्वळ नफा - चेअरमन उमेश डावखर

इमेज
       शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी   पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी  पतसंस्थेला 92 लाखांचा निव्वळ नफा - चेअरमन उमेश डावखर अहमदनगर (प्रतिनिधी)- पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्‍यांची सहकारी पतसंस्थेला सन 2020-2021 या आर्थिक वर्षात सुमारे 92 लाख 18 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन उमेश सदाशिव डावखर यांनी दिली. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्‍यांची सहकारी पतसंस्थेची स्थापना होऊन 75 वर्षे झालेली असून, संस्थेने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्हा असून, संस्थेची संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, शेवगाव या सभासदांच्या सोईसाठी चार शाखा कार्यरत आहेत. संस्थेची सभासद संख्या 2019 असून, स्वतःचे भाग भांडवल 8 कोटी 42 लाख रुपये आहेत. संचित ठेवी रुपये 33 कोटी 61 लाख आहेत. वार्षिक उलाढाल 212 कोटी झाली आहे. सभासदांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी संस्थेने सुमारे 74 कोटी 26 लाख कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेला 2020-2021 या आर्थिक वर्षात एकूण ढोबळ नफा 8 कोटी 51 लाख रुपये इतका झाला आ...

शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे परिवहन कर्मचार्‍यांचा अभिमान ; खडतर काळात दिलेली त्यांची सेवा प्रेरणादायी - बलभीम कुबडे राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने केवटे यांचा सन्मान

इमेज
        शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी एसटीचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे परिवहन कर्मचार्‍यांचा अभिमान ; खडतर काळात दिलेली त्यांची सेवा प्रेरणादायी - बलभीम कुबडे राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने केवटे यांचा सन्मान    अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांचा राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बलभीम कुबडे, खजिनदार विठ्ठल देवकर, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे नेते आनंदराव वायकर, अनंत लोखंडे आदिंसह केवटे कुटुंबीय उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1 जून 1948 रोजी झाली. पहिली बस चालू करण्याचा मान अहमदनगर विभागाला मिळाला होता. त्या बसवर पहिल्या वाहकाचा मान शहरातील लक्ष्मणराव केवटे यांना मिळाला होता. केवटे यांनी वयाची 97 वर्षे पुर्ण करुन 98 वर्षात पदार्पण केले असता त्यांचा संघटनेच्या वतीने माळीवाडा येथील राहत्या घरी विशेष सत्कार करण्यात आला.  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना 1 जू...

शीतल टाईम्स । - हजरत गौस ए आजम या सेवाभावी संस्थेची बेलापुरात स्थापना शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी

इमेज
       हजरत गौस ए आजम या सेवाभावी संस्थेची बेलापुरात स्थापना  शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी       बेलापुर गावामधे हजरत गौस ए आजम या सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली. बेलापुर गावाचे सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज पठाण यांचे हस्ते फित कापून फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी भीम गर्जनाचे महाराष्ट्र सचिव वाघमारे,  तालुका अध्यक्ष रफीक शाह, सामाजिक कार्यकरते रफीक शेख, हाजी सद्दामभाई, निसार शाह, अकबरभाई उपस्थित होते. 'हजरत गौस ए आजम' चे नुतन पदाधिकारी संस्थापक मुख्तार सैयद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपाध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ****************************************************** ******************************************************    -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  - *****  साप्ताहिक शीतल टाईम्स  ****** *******  R.N.I.NO.MAHMAR/2003/13182  ******* नियमित वाचा - ...

शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी पदाचा तोरा न मिरवता ग्रामस्थांसह रांगेत येऊन उपसरपंचांनी घेतली कोरोना लस

इमेज
       शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी पदाचा तोरा न मिरवता ग्रामस्थांसह रांगेत येऊन उपसरपंचांनी घेतली कोरोना लस प्रतिनिधी    बेलापूर -     कोविड लसीकरणा दरम्यान गोंधळ होऊ नये म्हणून, टोकण पध्दतीची सुरुवात करणाऱ्या बेलापूरात उपसरपंचानी आपल्या पदाचा तोरा न मिरवता, नियमानुसार टोकण पद्धतीने रांगेत येऊन लस घेतली व समाजापुढे एक आदर्श ठेवला.    लसीकरणा दरम्यान होणारा गोंधळ लक्षात  घेता जि प सदस्य शरद नवले यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रित निर्णय घेवुन टोकण पध्दत सुरु केली त्यामुळे कुठलीही गडबड गोंधळ न होता लसीकरण सुरळीत पार पडू लागले आज बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण होते बेलापुरचे उपसरपंच अभिषेक  खंडागळे यांनी सर्व सामान्य नागरीकाप्रमाणे पहाटे रांगेत येवुन आपले नाव नोंदविले तसेच नंबर आल्यानंतरच नंबर प्रमाणे येवुन लस घेतली  छोटे मोठे कार्यकर्ते आपल्या पदाचा तोरा मिरवुन आपली वैयक्तिक कामे करवुन घेतात त्या सर्वांच्या डोळ्यात उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी झणझणीत अंजन घातले आहे कितीही मोठे झालात तरी आपण एक सर्व सामान...
इमेज
       शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी   आरोग्य विभागाच्या गट क व ड संवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी कास्ट्राईब महासंघाच्या वतीने ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर प्रतिनिधी   - महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने गट क व ड संवर्गासाठी सरळ सेवेतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जाहिरातीच्या माध्यमातून गट क साठी 2,725 तर गट ड साठी 3,466 पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी दि.20 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत असून, मागासवर्गीय मुलांना कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा परिषद येथील कार्यालयात ऑनलाइन अर्ज भरण्याची व्यवस्था करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष के.के. जाधव व सरचिटणीस सुहास धीवर यांनी दिली. कास्ट्राईब कार्यालयात सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अनेक गरजू घटकातील युवक-युवतींना ऑनलाईन अर्जाची पुर्तता करता येत नाही. सायबर कॅफेमध्ये अधिक शुल्क आकारले जात असल्याने या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाह...