पोस्ट्स

शीतल टाईम्स //- बेलापूर येथील शेलार गल्लीत 'बिबट्या'चा वावर? डॅनियल शेलार यांच्या घरामागे आढळले रक्ताळलेले ठसे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

इमेज
   शीतल टाइम्स प्रतिनिधी    बेलापूर येथील शेलार गल्लीत 'बिबट्या'चा वावर?  डॅनियल शेलार यांच्या घरामागे आढळले रक्ताळलेले ठसे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बेलापूर | प्रतिनिधी येथील शेलार गल्ली परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचा वावर असल्याच्या संशयाने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक रहिवासी डॅनियल शेलार यांच्या घराच्या मागील बाजूस रक्ताने माखलेले काही गूढ पावलांचे ठसे आढळून आले आहेत. हे ठसे बिबट्याचेच असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, यामुळे संपूर्ण मोहल्ल्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूरमधील जिल्हा परिषद  मराठी मुला मुलींच्या शाळेसमोर असलेल्या शेलार गल्लीत आज सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डॅनियल शेलार यांच्या घराच्या मागील बाजूस काही प्राण्यांच्या पावलांचे ठसे उमटलेले आढळले.  विशेष म्हणजे हे ठसे साधे नसून ते रक्ताने माखलेले (रक्ताळलेले) होते. या ठशांचा आकार आणि नखांची रचना पाहून ते एखाद्या कुत्र्याचे आहेत की बिबट्यासारख्या हिंस्त्र वन्य प्राण्याचे असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. शेलार गल्ली, मराठी शाळा  व अ...

शीतल टाईम्स /- किशोर (उमेश) पवार, तालुका अध्यक्ष यांची मागणी: डिग्रस परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी किशोर (उमेश) पवार, तालुका अध्यक्ष यांची मागणी: डिग्रस परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा राहुरी-  राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस आणि परिसरातील वस्ती भागांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी मोठी चिंता बनला आहे. गेल्या काही दिवसांत कॅनॉल रोड, गावडे वस्ती, वाघमारे वस्ती, दळे वस्ती, बेलेकर वस्ती व बेल्हेकर वस्ती या ठिकाणी बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांमुळे गायी, शेळ्या, कुत्रे यांसारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या असून, या भागांमध्ये दाट मानवी वस्ती असल्याने मानवी जीवितहानीचा धोका वाढला आहे, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत गौसे आजम सेवाभावी संस्थाचे संस्थापक अली सय्यद अध्यक्ष सुल्तान शेख याच्या मार्गदर्शन खाली महाराष्ट्र राज्य, राहुरी तालुका यांच्या वतीने तालुका अध्यक्ष किशोर (उमेश) पवार यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाकडे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन मा. वनरक्षक अधिकारी आणि वन परीक्षेत्र अधिकारी, राहुरी या...

शीतल टाईम्स //- वेधमूर्ती महेश दायमा यांचा सन्मान ‘परिसवेध’ ग्रंथ वितरण सोहळ्यात मान्यवरांचा गौरव

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी वेधमूर्ती महेश दायमा यांचा सन्मान ‘परिसवेध’ ग्रंथ वितरण सोहळ्यात मान्यवरांचा गौरव  बेलापूर (प्रतिनिधी): भारतातील सर्व वैदिक विद्यालयांमधून प्रथम श्रेणी मिळवणारे वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा सन्मान प्रधान आयुक्त विलास वसंतराव शिंदे व त्यांच्या परिवाराच्या वतीने नुकताच करण्यात आला. प्रधान आयुक्त शिंदे आणि पुश फॉर फिलांथ्रोपिक अ‍ॅक्टिव्हिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त ‘परिसवेध’ या ग्रंथाचा वितरण सोहळा बेलापूर येथील सातभाई वस्ती येथे पार पडला. हा ग्रंथ महाराष्ट्र-गोवा राज्याचे वैचारिक प्रमुख रवींद्र (राजाभाऊ) मुळे यांनी लिहिला असून, त्याच कार्यक्रमात वेदमूर्ती दायमा यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पालक पत्रकार दिलीप दायमा व सौ. मीना दायमा यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात ज्योतिष तज्ज्ञ डॉ. प्रशांत लखोटिया व निशांत देवकर यांचाही गौरव झाला. तसेच बेलापूरचेच विलास शिंदे यांची प्रधान आयुक्तपदी झालेली नियुक्ती यानिमित्त त्यांचा पत्रकार देविदास देसाई, मारोतराव राशिनकर, दिलीप दायमा, विष...

शीतल टाईम्स //- बेलापूर बाजारतळात स्ट्रीट लाईट बसवून व्यापाऱ्यांना दिलासा गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या मागणीला ग्रामपंचायतीचा प्रतिसाद

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर बाजारतळात स्ट्रीट लाईट बसवून व्यापाऱ्यांना दिलासा गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या मागणीला ग्रामपंचायतीचा प्रतिसाद ; पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार  बेलापूर (प्रतिनिधी)  बेलापूर बाजारतळ परिसरात व्यापारी व ग्राहकांच्या सोयीसाठी स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. प्रवरा नदीच्या काठावर भरविण्यात येणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेते आणि ग्राहक मोठ्या संख्येने येतात. हा बाजार उशिरापर्यंत सुरू राहतो, परंतु स्ट्रीट लाईट नसल्याने व्यापारी व नागरिकांना अंधारात देवाणघेवाण करावी लागत होती. अंधाराचा फायदा घेत चोरी, देवाण घेवाणीत  हुका-चूक  व मोबाईल चोरीच्या घटनाही वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गौसे आजम सेवाभावी संस्थेने ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि उपसरपंच यांना निवेदन देऊन बाजारतळात तातडीने स्ट्रीट लाईट बसवाव्यात, अशी मागणी केली होती. संस्थेच्या या मागणीची दखल घेत बेलापूर ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई करून बाजारतळात स्ट्रीट लाईट बसविल्या. या कामगिरीबद्दल संस्थेच...

शीतल टाईम्स //- प्रगतशील शेतकरी तुकाराम भाऊ देवकर यांचे दुःखद निधन

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी प्रगतशील शेतकरी तुकाराम भाऊ देवकर यांचे दुःखद निधन   खोसपुरी (ता. नगर) : येथील प्रगतशील शेतकरी व खोसपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तुकाराम (भाऊ) देवकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. देवकर यांनी आपल्या कार्यकाळात सोसायटीच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले होते. त्यांचे शेतकी, सामाजिक तसेच संस्थात्मक कार्य गावात आदर्श मानले जाते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सावित्रीबाई फुले विद्यालय, राहुरी विदयापीठ येथील उपाध्यापक प्रा. ज्ञानदेव देवकर हे त्यांचे सुपुत्र होत. गावात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. ******************************** ********************************    -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  - **  साप्ताहिक शीतल टाईम्स  ** R.N.I.NO.MAHMAR/2003/13182  - बातम्या व जाहिरातीसाठी   *********- संपर्क - ********** ✒️  मुख्य संपादक   -  नरेंद्...

शीतल टाईम्स //- पुण्याच्या समिद्रा फाउंडेशनतर्फे बेलापूरला दिवाळी फराळ वाटप

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी पुण्याच्या समिद्रा फाउंडेशनतर्फे बेलापूरला दिवाळी फराळ वाटप बेलापूर (वार्ताहर)  पुणे येथील समिद्रा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने बेलापूर बु. ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचारी तसेच विविध समाजबांधवांना दिवाळी सणानिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. उक्कलगाव येथील सदाशिव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली समिद्रा फाउंडेशन ही संस्था पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त व नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवते. दरवर्षी बेलापूर ग्रामपंचायतीमार्फत दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम या संस्थेच्या वतीने सातत्याने राबविला जातो. यंदाही या उपक्रमात ग्रामपंचायत कर्मचारी तसेच घिसाडी समाज बांधवांना फराळाचे वाटप बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे, समिद्रा फाउंडेशनचे संचालक सदाशिव थोरात, श्वेता घोडके आणि बबनराव तागड यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, गावकरी पतसंस्थेचे चेअरमन अभिषेक खंडागळे, सरपं...

शीतल टाईम्स //- दीपावलीच्या मुहूर्तावर जे.टी.एस. हायस्कूलच्या 90-91 च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

इमेज
        शीतल टाइम्स प्रतिनिधी दीपावलीच्या मुहूर्तावर जे.टी.एस. हायस्कूलच्या 90-91 च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन बेलापूर (वार्ताहर)  बेलापूर येथील जे. टी. एस. हायस्कूलच्या सन 1990-91 च्या माजी विद्यार्थ्यांनी दीपावलीचा शुभमुहूर्त साधून आनंदी आणि भावनिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले. या भेटीत विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत बालपणातील क्षण पुन्हा अनुभवले. गाण्यांच्या ठेक्यावर सगळेच बेधुंद होऊन नाचले, तर हास्यकट्ट्यावर गप्पा आणि किस्स्यांनी वातावरण रंगले. शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्या काळातील निरागस मैत्री यांची आठवण करत सर्वांचे डोळे पाणावले. एकमेकांशी जीवनप्रवासातील अनुभव शेअर करताना उपस्थितांनी सांगितले की, “जीवन जगताना जर प्रामाणिक जिवलग सवंगडी सोबत असतील, तर औषधांची गरज भासत नाही.” विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व मित्र बालपणीच्या आठवणीत रममाण झाले होते. सकाळी सुरू झालेले हे गेट-टुगेदर गप्पा, हशा आणि आठवणींच्या ओघात संध्याकाळपर्यंत रंगले. या गोड कार्यक्रमाची सांगता “कभी अलविदा ना कहना” या भावनिक गाण्याने करण्यात आली. ****************...