शीतल टाइम्स //-कमी पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ठिबक सिंचनाचाच पर्याय -भानुदास मुरकुटे
शीतल टाइम्स प्रतिनिधी कमी पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ठिबक सिंचनाचाच पर्याय - मा.आ.भानुदास मुरकुटे बेलापूर (प्रतिनिधी) “भविष्यात पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. अशा परिस्थितीत शेती सुजलाम–सुफलाम करावयाची असेल तर ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचाच अवलंब करावा लागणार आहे,” असे प्रतिपादन अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे यांनी केले. प्रवरा माय जलपूजनाचा कार्यक्रम नुकताच मुरकुटे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, संजय छल्लारे, भरत साळुंके, रवींद्र खटोड, भास्कर बंगाळ, बेलापूर खुर्दच्या सरपंच सौ. सविता राजुळे, भगवान सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. मुरकुटे म्हणाले की, “भंडारदरा धरणातील आपल्या हक्काचे पाणी गेले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यातच शेती करावी लागणार आहे. भविष्यात बंद पाईपद्वारे पाणी आणून ठिबक सिंचनाद्वारे शेतांना द्यावे लागेल. ‘जल है तो कल है’ हे लक्षात घेऊन इजराइलच्या धर्तीवर कमी पाण्यात शेती करण्याच्या पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शासनाच...