शीतल टाइम्स //- बेलापूर-ऐनतपूरमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान; अभिषेक खंडागळे यांच्यासह अधिकारी, कार्यकर्त्यांचा पाहणी दौरा
शीतल टाइम्स प्रतिनिधी बेलापूर-ऐनतपूरमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान; अभिषेक खंडागळे यांच्यासह अधिकारी, कार्यकर्त्यांचा पाहणी दौरा बेलापूर (वार्ताहर): श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक आणि ऐनतपूर परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा बेलापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी आज सकाळी ६ वाजल्यापासून केला. त्यांच्यासोबत ग्राममहसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, महावितरणचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्री.खंडागळे यांनी नुकसानग्रस्त रहिवासी ग्रामस्थांना दिलासा देत, ग्रामपंचायतीकडून शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कोणतीही अडचण आल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश ग्राममहसूल अधिकारी यांना देण्यात आले. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वीज वितरण तारा आणि पोल पडले असल्याने, त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. पाहणी केलेल्या भागांमध...